ओ.बी.सी एस.सी. एन.टी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा "जी.आर" अखेर प्रसिद्ध...
ओ.बी.सी एस.सी. एन.टी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा "जी.आर" अखेर प्रसिद्ध... 

पनवेल / वार्ताहर :- 
काही दिवसांपूर्वी ओबीसी व एस.सी. एन. टी. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्स या विषयाकरता मिळणारी शिष्यवृत्ती मिळत नव्हती. शासनाने जारी केलेल्या ६४ अभ्यासक्रमांच्या परिपत्रकात या विषयाचे नाव चुकीचे आले किंवा राहूनच गेले त्यामुळे शिष्यवृत्तीच्या भरोशावर प्रवेश घेतलेल्या पिल्लेज महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षापासून फी मिळत नव्हती. सर्व विद्यार्थी व पालकांनी शिवसेनेचे पनवेलचे महानगर प्रमुख माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांची यासंदर्भात भेट घेतली. त्वरित या विषयाचा पाठपुरावा सुरू करत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने  व एकनाथ शिंदे साहेबांच्या अंतिम आदेशाने हा विषय निकाली निघाला.

विद्यार्थ्यांनी प्रथमेश सोमण खासदार आप्पा बारणे व मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर अवघ्या दोनच दिवसात शासनाचा सुधारित जी.आर देखील प्रसिद्ध झाला व त्यामध्ये राहून गेलेल्या 'इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्स' या विषयाचे नाव समाविष्ट करण्यात आले यामुळे ओबीसी आणि एस. सी. एन. टी. व्ही. जे. एन. टी. प्रवर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची तीन वर्षांची एकूण चार ते साडेचार लाख रुपये प्रत्येकी फी आता सरकार भरणार असून विद्यार्थी खुश झाले आहेत. शासनाचे परिपत्रकच नव्याने जाहीर झाल्यामुळे आपोआपच संपूर्ण महाराष्ट्रभरात हा विषय लागू होईल व इतरही जिथे त्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. सुधारित आलेला जीआर मध्ये विषयाचे समाविष्ट करण्यात आलेले नाव क्रमांक १९ वर नमूद करण्यात आले आहे. 
सदरचा जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, तळोजा विभागप्रमुख प्रकाश म्हात्रे, शहर संघटक अभिजीत साखरे यांच्यासह पिल्लेज महाविद्यालयात जाऊन प्रचार्यांची यांची भेट घेतली. व त्यांना जीआर सुपुर्द करून आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रथमेश सोमण व त्यांच्या टीमचा सत्कार केला व खासदार आप्पा बारणे यांचेही आभार मानले.
Comments