लालबागच्या राजाचे भक्तांना घडणार पनवेल मध्ये दर्शन...
भक्तांना घडणार पनवेल मध्ये दर्शन..

पनवेल वैभव / प्रतिनिधी - :   भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या व ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा सागर मुंबईत लोटतो त्या लालबागच्या राजाचे दर्शन पनवेलकरांना होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना श्रीगौरा गणेश उस्तवा निमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये २ आक्टोंबर २०२३ ला विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेश उस्तवाचे ३१ वे वर्ष असुन सामाजिक बांधिलकी जोपासुन श्रीगौरा गणेश उस्तव मोठया भक्तीमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत साजरा केला जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगीतले आहे. पनवेल मधिल महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने गेल्या ३० वर्षापासुन गौरा गणेश उस्तव साजरा केला जात आहे. या संघटनेचे हजारो सभासद असुन यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करुन आपले उदरनिर्वाह करणाऱ्यांचा सहभाग मोठया संख्येन आहे. गौरा गणेश उस्तव साजरा करण्यामागची संकल्पना सांगताना महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले की पनवेल तालुक्यात गणेश उस्तव साजरा होत असताना गणेश भक्ताना गणरायासाठी आवश्यक असणारे साहीत्य विक्री करण्यात येथील छोटे व्यवसायीक गुतलेले असतात त्यावेळी गणेश उस्तवाचा आनंद घेता येत नाही सर्वच संघटनेचे सभासद गणेश उस्तव मोठया उस्ताहाने साजरा करु शकत नाहीत यासाठीच संघटनेने ३० वर्षापुर्वी गौरा गणेश उस्तव साजरा करण्याची सुरवात केली. 
२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता अभिजीत उत्तमराव जाधव, दत्ता बाबू खराते, संजय पटेल साई ज्वेलर्स, प्रतिक मोहन ठक्कर, महेश दत्तात्रेय भालेकर, श्यामबाबू गंगासागर गुप्ता, दिलीप पांडूरंग कावळे यांच्या शुभहस्ते श्री गौरा गणेशपूजन होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना गौरा गणेश उस्तवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले. उस्तवाच्या प्रारंभी वेगवेगळया मुर्तिची प्रतिष्ठापणा केली जात होती. परतू गेल्या २४ वर्षापासुन लालबागच्या राज्याची प्रतिकृती पनवेल मध्येच तयार करुन स्थापना केली जात आहे. लालबागच्या राजाची मुर्ति साकारणारे संतोष कांबळी व त्यांचे ईतर सहकार गेल्या पंधरा ते विस दिवसापांसुन पनवेल मध्ये गणेश मुर्ति साकारण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत तसेच राजाचे धोतर सजवण्याचे काम रुपेश पवार करीत आहेत. उस्तवा निमित्त भव्य मंडप व विद्युत रोषणाईचे विषेश आकर्षक परब डेकोरेटर्स करत असते.
गौरा गणेश उस्तव साजरा करीत असताना सर्व धर्मिय जात पात वंश भेद विसरून एक दिलाने काम करीत असतात. याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ जवळपास साठहजारापेक्षा जास्त गणेश भक्त घेत असतात.
गौरा गणेश उस्तवात कोकणातील बाल्या नाचाच्या स्पर्धा आयोजित करुन बाल्या नाच कसा टिकेल यासाठी संघटना प्रयत्न करीत असते.
तसेच मंडळाच्या माध्यमातून विविध शिबिराचे आयोजन करण्यात येते असे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले. पनवेलमधिल मार्केटच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी मुंबई , ठाणे , नवीमुंबई , तसेच रायगड जिल्हयातुन पाच लाखांच्यापेक्षा जास्त भाविक आपली हजेरी लावतात. 

लालबागच्या राजाचे दर्शन झाले नाही असे भाविक व पुर्ण केलेल्या मनोकामनाचे नवस फेडण्यासाठी भक्त पनवेलकडे धाव घेतात असे संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगुन पनवेल करांनवर राजाची कृपा असल्याचे भावुक होउन सांगतात. 
दिड दिवसांनंतर मोठ्या दिमाखात शाही थाटात राजाचे विर्सजन ३ आक्टोंबर २०२३ ला मोठ्या होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले.
मंडळाचे सचिव दिलीप अनभुले, खजिनदार अनंता कोळी, नारायण अंबोलकर, महादेव खराते, महान नाईक, चंद्रशेखर भोपी, रमेश गुप्ता, जीतलाल गुप्ता, विजय मराठे, महेश भालेकर, शिवबाबू गुप्ता, मोहन ठक्कर व अन्य सभासद हा उस्तव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतात.
Comments