पनवेल तालुका सायबर क्राईम अधिकाऱ्यांचे अमली पदार्थांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..
अमली पदार्थांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

पनवेल दि.०८(संजय कदम): श्री छत्रपति विद्यालय सायन्स ज्युनिअर कॉलेज वांवजे येथे सायबर क्राईमची पनवेल तालुका पोलिसानी अमली पदार्थ विरोधी पथक विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती दिली. यावेळी पनवेल तालुक्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पोवार, विकास साळवी, विजय सिंगे, पोलिस हवलदार लोंढे, रवींद्र पाटील, प्रकाश खैरे,  प्राचार्य कांरडे सर शिक्षक वर्ग आदि उपस्थित होते. 
यावेळी विजय शिंगे यांनी अमली पदार्थाच्या सेवनाबाबत मार्गदर्शनात सांगितले की, अमली पदार्थाचा सेवन करणे आरोग्यास घातक, ड्रग्स,  गांजा, अफू, दारू, या अमली पदार्थांच्या सेवनाची सुरुवात तंबाखू सेवनाने होते. तरुण पिढ़ी उध्वस्त करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थाचा पुरवठा परराष्ट्रांतून होते. अमली पदार्थाच्या विक्रीनुसार शिक्षेची तरतूद 20 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. अमली पदार्थांना नाही म्हणणे गरजेचे आहे. आमिषांना बळी पडू नका असे सांगितले तसेच सायबर गुन्ह्यांबाबत मागर्दर्शनात सांगितले की मोबाईलवरील लिंक, मोबाईक हॅक, लैंगिक गुन्हे, यांचा समावेश, अनोळखी लिंक ओपन करू नका. सोशल - मीडिया - व्हॉटसअप इन्स्टाग्राम यावरून लैंगिक शोषण होते. इंटरनेटवरील ओळखीवर विश्वास ठेवू नका, सोशल मिडीयावरील मैत्रीला बळी पडू नका. अननोन लिंक, अननोन व्यक्तीवर विश्वास ठेवू नका असे आव्हान केले. 



फोटो : मार्गदर्शन
Comments