गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल फ्री पास उपलब्ध करून द्या ; पनवेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील..
पनवेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील..

पनवेल दि.१५(वार्ताहर):  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरात लवकर टोल फ्री पास उपलब्ध करून देण्याबाबत पनवेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन  देण्यात आले आहे. 
      गणेशोत्सव सणाला अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, पनवेल आदि ठिकाणाहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारकडून टोल मुक्त करण्यात आला आहे. मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाल्याचे पाहायला मिळत नाही. परिणामी यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे. या धर्तीवर कोकणवासियांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मोफत टोल पास उपलब्ध करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला व अधिकान्यांना आदेश निर्गमित करावेत अशी विनंती सुदाम पाटील यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. फोटो : सुदाम पाटील
Comments