कर्नाळा अभयारण्याच्या महामार्गावर जेएसडब्लू कंपनीची बस झाली पलटी..
कर्नाळा अभयारण्याच्या महामार्गावर जेएसडब्लू कंपनीची बस झाली पलटी..


पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्याच्या गेट समोर आज दुपारच्या सुमारास जेएसडब्लू कंपनीची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
     कर्नाळा अभयारण्यामध्ये आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेली जे एस डब्ल्यू कंपनीची बस क्रमांकएम एस ४६ बी यू २२३९ वरील  चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन बस पलटी झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून या अपघातामुळे पेणकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पनवेल पेण मार्गावर वळविण्यात आली आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या पावसाळामुळे बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. 



फोटो: अपघातग्रस्त बस
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image