३० वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ...

पनवेल दि. २५ ( संजय कदम ) : ३० वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी पंजाब येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे एक खून अखेरीस उघडकीस आला आहे .                        
पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रारदार नामे तरसिमसिंग बच्चनसिंग चंगम, रा. एक ६/७, सेक्टर ०४, सीबीडी बेलापुर, यांनी दि. १२/११/१९९४ रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, मयत इसम काशमीरासिंग अजितसिंग विर्क उर्फ जाट, वय ३८ वर्षे हे टैंकर क्र. एम.टी.टी./३७८७ हयामधुन जात असताना अटक आरोपी सलविंदरसिंग अमरसिंग मजबी तसेच पाहिजे आरोपी बिट्टूसिंग अर्जुनसिंग मजबी व बाऊसिंग अर्जुनसिंग गौडस यांनी आपसात संगणमत करून अटक आरोपी सळविंदरसिंग मजवी यास मयताने चालकाचे नोकरीतून काढून कमी केल्याचा राग मनात धरून मयतास लोखंडी टॉमीने डोक्यावर व शरिरावर गंभीर स्वरुपाच्या दुखापती करून जिवे ठार मारले आहे म्हणून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हादाखल करण्यात आला होता.पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, परिमंडळ ०२, पनवेल यांनी सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत व वपोनि नितीन ठाकरे यांना अभिलेखावरील खून या सदराखाली पाहिजे आरोपी विरुद्ध विशेष शोध मोहिम राबविण्याचा आदेश दिला होता. तेव्हा सदर गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरिता पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. तपास पथकातील पोउपनि अमोल चौगुले व पोहवा नितीन वाघमारे यांनी सदर गुन्हयाचे कागदपत्रे प्राप्त करुन आरोपीचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र अथवा मोबाईल क्रमांक उपलब्ध नसताना पाहिजे आरोपींबाबत माहिती संकलित केली. प्राप्त माहिती व गोपनीय सूत्र यांचेकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे पाहिजे आरोपींपैकी आरोपी चाऊसिंग अर्जुनसिंग गौरास, रा. रय्या, जि. अमृतसर हा मयत झाल्याचे तसेच आरोपी विदुसिंग अर्जुनसिंग हा सध्या त्याचे नाव बलविंदरसिंग दर्शनसिंग असे बदलुन राहत असल्याची माहिती मिळाली.
सदर बातमीची खातरजमा करुन पोउपनि विनोद लभडे, पोहवा अविनाश गंथडे, पोना अशोक राठोड, पोना मिथून भोसले, पोशि विशाल दुधे व पोलीस मित्र राहुल राठोड असे तपास पथक तयार करण्यात आले. नमुद पोलीस पथकाने स्थानिक पोलीस अधिकारी जुगराज सिंग, पो. अधिक्षक अमृतसर व सज्जन सिंग चीमा (सेवानिवृत्त) यांचेशी योग्य समन्यवय साधुन अविरत १० दिवस पाहिजे आरोपी बिदुसिंग अर्जुनसिंग ( बलविंदरसिंग दर्शनसिंग ) याचा शोध घेवून त्यास नमुद गुन्हयामध्ये ताब्यात घेवून अटक केले आहे. तसेच सदर गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त  मिलिंद भारंबे व सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस उपआयुक्त  पंकज डहाणे, परिमंडल ०२ पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image