काम बंद करण्याची धमकी देऊन एका इसमास लाकडी बांबूने मारहाण...
काम बंद करण्याची धमकी देऊन एका इसमास लाकडी बांबूने मारहाण...


पनवेल दि.०५(वार्ताहर): एक घरात मार्बलचा पलंग तोडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी एक इसम येऊन त्याने तेथे काम करणाऱ्या चार कामगारांना   काम करायचे नाही असे धमकावून तसेच दमदाटी देऊन तेथील घर मालकाला शिवीगाळी करून त्याला लाकडी बांबू उचलून मारहाण केल्याची घटना पनवेल शहरातील भुसारी मोहल्ला येथे घडली आहे. 
अब्दुल्ला शोएब शेख (वय २५) याच्या घरात मार्बलचा पलंग तोडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी आरोपी जिशान पटेल (वय ३६) हे येऊन त्यांनी  तेथे काम करणाऱ्या चार कामगारांना  काम करायचे नाही असे धमकावून तसेच दमदाटी देऊन तेथे असलेल्या अब्दुल्ला शेख याला शिवीगाळी करून लाकडी बांबूने मारहाण केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments