जालना येथे मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा सकल मराठा समाजाने केला निषेध ; सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी...
सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी...


पनवेल वैभव / दि . ०२ ( संजय कदम ) : जालना येथील मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा आज सकल मराठा समाजाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या जवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व या लाठी हल्ल्याची जबाबदारी शासनाने स्वीकारून त्यानी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे . 
                      यावेळी सकल मराठा समाज पनवेलचे विनोद साबळे , गणेश कडू ,रामेश्वर आंग्रे ,यतीन देशमुख ,अल्पेश माने ,कमलाकर लबडे ,राजश्री कदम, कालिदास देशमुख ,संतोष जाधव ,समाधान काशीद ,सदानंद शिर्के ,प्रवीण जाधव , कुणाल कुरघोडे ,पराग मोहिते ,आतिश साबळे , विकास वारदे, शिवाजी दांगट ,सुधीर मोरे ,सचिन भगत, अनिल जाधव यासह शेकडो मराठा समाज बांधव एकवटले होते . यावेळी बोलताना विनोद साबळे यांनी सांगितले की , मागील दोन दिवसांपासून जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाकडून संविधानिक पद्धतीने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी उपषोणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या मदतीने सदर आंदोलन चिरडण्यासाठी मराठा समाज बांधवांवर अमानवीय पद्धतीने लाठीहल्ला व हवेत गोळीबार केला गेला. सदर लाठीहल्ल्यात मराठा समाजाच्या माता भगीनी व लहान मुलांवर देखील पोलीसांमार्फत लाठीहल्ला केला गेला या अमानवीय लाठी हल्ल्यात अनेक मराठा बांधव व माता-भगिनीं मुले हे गंभीर जखमी झाले आहेत. या निंदनिय घटनेचा आम्ही सकल मराठा समाज रायगड म्हणून राज्यसरकारचा व लाठीहल्ला करणाऱ्या पोलीसांचा जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले तर गणेश कडू यांनी सांगितले की ,सदर घटनेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारून, सदर प्रकारात दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा रायगड जिल्ह्यात पुढे होणारे आंदोलन हे अधिक तीव्र असेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारचीच असेल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी जमलेल्या शेकडो मराठा समाज बांधवानी शासनाच्या निषेधात्मक घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी पोलिसांना त्यांच्या मागणीचे निवेदन सुद्धा देण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो - सकल मराठा समाजाचे आंदोलन
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image