खा, खेळा, वाचाचा पहिला गणेशोत्सव थाटात झाला साजरा ..
खा, खेळा, वाचाचा पहिला गणेशोत्सव थाटात झाला साजरा ..

 पनवेल / प्रतिनिधी - : संस्थापक अपर्णा. आर. शहा यांनी स्थापन केलेल्या " खा, खेळा, वाचा " या अभियानाला यावर्षीच्या गणेशउत्सवात बरेच प्रोत्साहन मिळाले. गणेशोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा झाला.
     भारतातील सणामध्ये गणेशोत्सव हा एक सर्वात लोकप्रिय असा सण आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. यावर्षीच्या गणेशउत्सवसाठी खा, खेळा, वाचा, सुंदर देखावा तयार करण्यात आला होता. तसेच अनेक व्यक्तींनी " खा, खेळा, वाचा " चे वैयक्तिक देखावे करुन या अभियानाला प्रोत्साहन दिले. अनेक लोकांनी खा, खेळा, वाचाचे फोटो आपआपल्या सोशल मीडिया वर पोस्ट केले आणि लोकांना मनापासून खा, मजेशीर खेळा, आणि उत्सुकतेने वाचा हा संदेश दिला. एक, दोन, तीन, चार.....खा, खेळा, वाचा एक सुंदर विचार "अशाप्रकारे अनेक घोषवाक्य गणेशाच्या आरतीनंतर जोरदार आवाजात दुमदुमली जात होती. १० दिवसांचा गणेशउत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदाने साजरा झाला.
Comments