ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडे १४ लाखाची फसवणूक....
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडे १४ लाखाची फसवणूक....


पनवेल दि.२१ (संजय कदम) : सोप्या ऑनलाइन टास्क पूर्ण करा आणि घरबसल्या अतिरिक्त उत्पन्न मिळवा अशा आशयाचे फसवे आश्वासन देत पळस्पे येथील एका ४२ वर्षीय इसमाची त्रिकुटाने साडे चौदा लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      कोरोनानंतर अनेक जण नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्नात असतात. त्यातच प्रत्येक क्षेत्रात वर्क फ्रॉम होम संकल्पना रुजली आहे. याचा फायदा घेत सायबर चोरटे घरबसल्या उत्पन्न मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करत असल्याची घटना घडत आहे. पनवेल परिसरातील पळस्पेफाटा येथील मॅरेथॉन नेक्सझोन इमारतीत राहणारे आनंद पांडुरंग पाटील (वय ४२) यांची सुद्धा अश्याप्रकारे फसवणूक झाली आहे. सोप्या ऑनलाइन टास्क पूर्ण करा आणि घरबसल्या अतिरिक्त उत्पन्न मिळवा अशा आशयाचे फसवे आश्वासन देत आरोपी जिया मिश्रा, मनिषा त्रिपाठी, अलीना इसाबेला यांनी आनंद पाटील यांना टास्कमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून त्यांच्याकडून १४ लाख ४३ हजार ९०० रुपये उकळूले. वारंवार पैश्याची मागणी केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आनंद पाटील यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image