मालधक्का परिसरातील खुनाचा पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला पर्दाफाश ; आरोपीकडे मोबाईलही नसताना मोठ्या खुबीने पोलिसांनी केला तपास....
आरोपीकडे मोबाईलही नसताना मोठ्या खुबीने पोलिसांनी केला तपास....

पनवेल दि.११(संजय कदम):  पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात एका २७ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात आरोपी मोबाईल फोन वापरत नव्हता तरीही पोलिसाना त्याचा शोध घेऊन यश आले.
        पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया (वय २७) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केली होती. सदर ठिकाणी बीट मार्शल क्र. ०१ व अधिक पोलीस स्टाफ यांनी जावुन खात्री करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी केलेल्या सुचनेनुसार व पोलीस उपआयुक्त पंकज डाहणे, परि ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल शहर पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान, सपोनि प्रकाश पवार, बजरंग राजपुत, पोउपनि अभयसिंह शिंदे व पोलीस अंमलदार असे तीन वेगवेगळे पोलीस पथक तयार केले. पथकातील सपोनि प्रकाश पवार, पोउपनि अभयसिंह शिंदे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करुन तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासावरुन सदरचा गुन्हा हा सचिन अरुण शिंदे (रा. बौद्धवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याने केला असून तो अस्तित्व लपविण्यासाठी मुळ गावी पळून गेला असल्याचे तपासात निष्पन्न केले. त्यानुसार सपोनि राजपुत व पोलीस पथक यांच्याशी समन्वय राखुन आरोपीला मूळ गावातून अटक करून अवघ्या ४८ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. 
फोटो: मयत विकी चिंडालिया
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image