मा.नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर...
 वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर...


पनवेल दि.२४ (संजय कदम) : जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, मा. नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त जाणीव एक सामाजिक संस्था, माता बालसंगोपन मंडळाचे सुतीकागृह व स्वाती ऑप्टीक्स पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, नेत्रचिकीत्सा व मोफत चश्मे वाटप शिबीर मंगळवार २९ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा प्रभाग क्र. १८ मधील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
              पनवेल महानगरपालिका जवळील गोखले हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत आयोजित या शिबिरामध्ये रक्त तपासणी, आरबीरस शुगर तपासणी, सीबीसी तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी, प्राथमिक तपासणी (ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी व इतर) स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, नेत्र तपासणी व मोफत चश्मे वाटप तसेच इतर सर्व आजारांवर मोफत सल्ला व तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबीरात आपले नाव नोंदणीसाठी मा. नगरसेवक नितीन जयराम पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय किंवा प्रसाद कंधारे (8451842919), महेश सरदेसाई (9323266163), प्रसाद हनुमंते (7666327009) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  
फोटो : नितीन पाटील
Comments