पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस पाटील महिला दक्षता समिती सदस्यांची समन्वय बैठक संपन्न .....
महिला दक्षता समिती सदस्यांची समन्वय बैठक संपन्न .....
पनवेल दि. ०७ ( संजय कदम  ) :पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील ,महिला दक्षता समिती सदस्य, यांची समन्वय बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल येथे  घेण्यात आली. यावेळी आगामी  सण उत्सवानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले . 
             
यावेळी बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, सण - उत्सव, पावसाळा, धरणे, धबधबे, अवैद्य  धंदे, भाडेकरू, संशयित इसम वाहने इत्यादी  बाबत सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच लोकसहभागातून हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसून गावाची सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी. पोनी ( गुन्हे )  शेलकर व पोलीस उप निरीक्षक माधव इंगळे यांनी उपस्थितांना महत्वाच्या सूचना केल्या त्यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरीक , महिला व लहान मुले यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच  कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने लोक सहभागातून जास्तीत जास्त सी सी टीव्ही कॅमेरे बसविणे तसेच भाडेकरू ची माहिती देणे , येणारे सण उत्सव व सध्याची राजकीय परिस्थिती च्या अनुषंगाने गावातील विशेष घटना या  बाबत माहिती देणे. ग्रामीण भागात गावठी दारू, अवैध धंदे, ईत्यादी माहिती  देणे.सध्याचे पावसाळी वातावरण असल्याने पाणी थांबणारे ठिकाणे, धबधबे, धरणे, ईत्यादी ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.  त्याचे सुरक्षाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे कडून मनाई आदेश फलक प्रसारीत केला आहे. तसेच दरड कोसळणारे ठिकाणाची माहिती , पाणी साचणारे ठिकाण व त्यातून जीवित हानी होऊ नये याकरिता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता डायल 112 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा, तसेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न असल्यास फोन द्वारे किंवा पोलीस पाटील यांच्या ग्रुप वर शेअर करावा बाबत माहिती देण्यात आली त्याच प्रमाणे संशयित इसम, बेवारस वाहन, संशयित वस्तू, ईत्यादी  माहिती देण्याबाबत योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या . आयोजित बैठकीस हद्दीतील  एकूण  35 पोलिस पाटील , महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.






फोटो - पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने  हद्दीतील पोलिस पाटील महिला दक्षता समिती सदस्य यांची समन्वय बैठक
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image