कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे अवघ्या दोन तासात हरवलेला मोबाईल मिळाला परत...
दोन तासात हरवलेला मोबाईल मिळाला परत... 



पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ) : कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे चार चाकी गाडीत विसरलेला मोबाईल फोन सदर प्रवाश्याला अवघ्या दोन तासात परत मिळाल्याने त्याने कळंबोली वाहतूक शाखेचे आभार मानले आहेत . 
                     अभय पाटील हे काही कामानिमित्त जयसिंगपूर येथून कामोठे येथे आले होते सदरचे काम ऑटोपून ते मॅकडॉनल्ड येथून खाजगी चार चाकी वाहनाने पुणे येथे गेले परंतु पुणे येथे उतरत असताना त्यांचा मोबाईल त्याच गाडीत विसरल्याने त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी गाडीचा शोध घेतला परंतु गाडी मिळून आली नाही सदर वेळी त्यांनी त्यांचे नवी मुंबई ओळखीचे अमित रणदिवे यांना संपर्क करून माहिती दिली त्यानुसार रणदिवे यांनी कळंबोली वाहतूक शाखेचे अतुल शिंदे  यांना माहिती दिली त्वरित पोलीस हवालदार शिंदे यांनी वपोनि, बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मॅकडोनाल्ड बीटचे अंमलदार सोमनाथ गायकवाड यांना संपर्क करून माहिती दिली त्यावेळी नमूद दोन्ही अंमलदार यांनी तात्काळ मॅकडोनाल्ड  येथे जाऊन पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही द्वारे गाडी नंबर प्राप्त करून त्यावरून संपर्क क्रमांक मिळून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही वेळाने फोन उचलला व सदरचा फोन हा सायलेंटवर असून गाडीतच विसरले त्यांनी सांगितले व आणून देत असल्याचे सांगितले त्यानंतर सदर गाडी मालकाने तो मोबाईल चौकीत जमा केला, सदरचा मोबाईल पाटील यांचे नातेवाईक अमित रणदिवे यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आला . 
फोटो - कळंबोली वाहतूक शाखेच्या तप्तरतेमुळे अवघ्या दोन तासात हरवलेला मोबाईल मिळाला परत
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image