वाहतूक कोंडीबाबत प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेनेने घेतली उपायुक्तांची भेट ...
 शिवसेनेने घेतली उपायुक्तांची भेट ...


पनवेल / वार्ताहर  : - येऊ घातलेल्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल मध्ये वाहतूक कोंडी हळूहळू वाढत चालली आहे पार्किंगच्या समस्या, बेशिस्त वाहनचालक, वाढलेली लोकसंख्या व त्या प्रमाणात कमी असलेले वाहतूक पोलिसांचे कर्मचारी यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व त्याच्या समस्या पनवेलमध्ये वाढत असताना काल 19 ऑगस्ट रोजी पनवेलचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी शहरातल्या प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नवी मुंबईचे वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांची पनवेल येथेच भेट घेतली तिरुपती काकडे यांनी काल स्वतःहून रस्त्यावर उतरत वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पनवेलमध्ये नेहमीच्या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. 
यावेळी अशा ठिकाणी "फिक्स पॉईंट" तत्त्वावर किमान पुढील चार ते सहा महिने वाहतूक विभागाचे कर्मचारी किंवा ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची विनंती शिवसेनेतर्फे करण्यात आली त्याचप्रमाणे शहरात ज्या ठिकाणी साधारणतः नित्याचीच वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी तक्रार करण्यासाठी वाहतूक विभागाने स्वतःचे नंबर जाहीर करावेत अशी मागणी सुद्धा शिवसेनेने केली , तथा पार्किंगच्या विषयात किंवा अन्य कुठल्याही संबंधित खात्याकडून वाहतूक नियमन होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा शिवसेना स्टाईलने करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले. तिरुपती काकडे यांनी यावेळेस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. 
याप्रसंगी प्रथमेश सोमण यांच्या समवेत शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, मंदार काणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील इत्यादी उपस्थित होते.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image