जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने स्वीकारले इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांचे शैक्षणिक व रोजगारामध्ये पालकत्व...
बांधवांचे शैक्षणिक व रोजगारामध्ये पालकत्व स्वीकारले...

पनवेल : इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या तात्पुरता निवारा केंद्रात पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या पत्नी ममता प्रितम म्हात्रे गेले होते. तेथील लहान मुली आणि महिलांशी ममता प्रितम म्हात्रे यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला त्यानंतर जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून बोलल्याप्रमाणे या बांधवांपैकी काही जणांना शैक्षणिक आणि रोजगारामध्ये पालकत्व स्वीकारावे असा निर्णय पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ममता प्रितम म्हात्रे यांनी घेतला.            
याबाबत खालापूर विभागीय तहसीलदार, प्रांत आणि रायगड जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष लेखी स्वरूपात मागणी केली, ज्यामध्ये कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तेथील 3 लहान बहिणी त्यांच्या शिक्षणाचा भार उचलणे त्याचबरोबर तेथील 7 तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी सुद्धा देण्यास तयार असल्याचे प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले आहे. शासनाकडून सद्य परिस्थितीत करण्यात आलेल्या तेथील व्यवस्थेबाबत यावेळी माहिती देखील घेतली. 
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image