शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मार्कंडेय पूजन व महायज्ञ संपन्न...
   मार्कंडेय पूजन व महायज्ञ संपन्न...


पनवेल /प्रतिनिधी:
शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी व महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे मार्कंडेय पूजन व महायज्ञाचे नियोजन करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित श्री हनुमान मंदिर लाईन आळी पनवेल येथे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी शिवसेना पनवेलच्यावतीने २७ जुलै २०२३ रोजी मार्कंडेय पूजन महायज्ञ करण्यात आला. यावेळी पनवेल मधील नागरिकांनी व शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवली व मार्कंडेय महायज्ञाचे पूजन दर्शन करून उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा सल्लगार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास  पाटील, भरत पाटील, दीपक निकम, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, दीपक घरत, अच्युत मनोरे, शहर प्रमुख 
प्रवीण जाधव, राकेश टेमघरे, महिला संघटिका अर्चना कुलकर्णी, राहुल गोगटे, मा.नगरसेविका प्रिती जॉर्ज पराग मोहिते, कुणाल कुरघोडे, विश्वास म्हात्रे, कामोठा शाखा संघटिका वर्षा चव्हाण, रोहित टेमघरे, संकेत बुटाला, भास्कर पाटील, साईसूरज पवार विलास पाटील,अरुण ठाकूर, प्रशांत नरसाळे, चंद्रकांत शिर्के, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments