सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी पनवेलमध्ये व्याख्यान ...
सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी पनवेलमध्ये व्याख्यान ...


पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्यावतीने रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व 'प्रतिपक्ष' या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
         भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. भाऊ तोरसेकर यांनी साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या साप्ताहिकमध्ये त्यांनी काम केले. प्रतिपक्ष नावाच यूट्यूब चनल आह. माऊच्या जागता पहारा या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image