नवीन पनवेल व कळंबोली मधील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई...
नवीन पनवेल व कळंबोली मधील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई...

पनवेल दि.०५(वार्ताहर): नवीन पनवेल व कळंबोलीमधील फूटपाथवरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवरती आज आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिकेच्यावतीने दिनांक 5 जुलै रोजी कारवाई करण्यात आली.
      गेल्या काहि दिवसांपासून प्रभाग ब अंतर्गत असलेल्या कळंबोली व नवीन पनवेल या भागांमध्ये रात्रीतून फूटपाथवरती अनधिकृत टपऱ्या उभारल्या जात होत्या. अखेर आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी अतिक्रमण विभागांतर्गत  या दोन्ही ठिकाणांवरील पाच टपऱ्यांवरती कारवाई केली. रात्रीतून फूटपाथवरती अनधिकृतपणे टपऱ्या उभारल्या जात असल्याने नागरिकांना चालण्यासाठी त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिकेकडे येत होत्या. अखेर जेसीबीच्या साहाय्याने या अनधिकृत टपाऱ्या पाडण्यात आल्या व  टपऱ्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
फोटो : अनधिकृत टपऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई
Comments