दिशा महिला मंच आयोजित श्रावण रंग कार्यक्रमाचे आयोजन...
पनवेल दि.३१ (वार्ताहर) : दिशा महिला मंच आयोजित श्रावण रंग कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनी येथील बेलेझ्झा हॉल येथे करण्यात आले होते. महिलांना सांस्कृतिक दृष्ट्या दिशा व्यासपीठ नेहमीच उपलब्ध करून देत असते. श्रावणातील रंग अनुभवण्यासाठी थोडा वेळ स्वतः साठी जगण्यासाठी तसेच "नव्या युगासावे चालून जुन्या परंपरा जपून दोघांचा संगम घडवून मंगळागौरीचा जागर करूया "हे ब्रीदवाक्य घेऊन 'स्त्री' विषयावर सामाजिक संदेश देऊन मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 20 ग्रुप सहभागी झाले होते. बाईपण जगत असतानाचे अनेक पैलू प्रत्येक ग्रुप मधून दाखविण्यात आले होते.
या कार्यक्रमास आर. के. ग्रुप चे डायरेक्टर राजेंद्र कोळकर, रांगोत्सव सेलेब्रेशन चे डायरेक्टर संग्राम दाते, मॅजिक पिटारा स्कूल चे दिपक कपूर व राजेश्री कपूर, ओम डेंटल क्लीनिक च्या डॉ. स्वाती वारे, शर्वरी इंटरप्रायजेस च्या शर्वरी पाटने, ग्लोरी ब्युटी पार्लर च्या पूजा कुटे, व्हॅल्यू ऑफ स्माईल फॉउंडेशनच्या हरजींदर कौर, हर्ब अँड ग्लोब चे कल्पेश सोमैय्या व मनिषा सोनवणे तसेच प्रतीक पोटोग्राफर चे प्रतीक चव्हाण, विनस वूमन्स हॉस्पिटल व फ्रोजन फूड च्या अश्विनी ढोके या मान्यवरांचे विशेष सहकार्य मिळाले. तसेच या मान्यवरांकडून दिशा व्यासपीठामार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे विशेष कौतुक झाले. सामाजिक संदेश देऊन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डॉ टीम ने मुलगी झाली हो विषयावर सामाजिक संदेश देऊन माणिकर्णिक ग्रुप ने प्रथम क्रमांक पटकवला, स्त्री व तिचे अस्तित्व सादर करत स्त्री शक्ती ग्रुप ने दुसरा क्रमांक पटकवला व देशातील स्त्री शक्तीला प्रणाम करत अभुदया ग्रुप ने तिसरा क्रमांक पटकवला तसेच उत्तेजनार्थ आकांक्षा ग्रुप व हिरकणी ग्रुप ने क्रमांक पटकवला. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सर्व स्पर्धेकांना सन्मानित करण्यात आले. भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी नृत्यांगना मिताली सुभाष पारंगे व बॉलीवूड कोरिओग्राफर सचिन भगत यांनी उत्तमरित्या परीक्षण केले. यावेळी दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा व्यासपीठावरील आत्मविश्वास, मनोधैर्य वाढावं यासाठी दिशा व्यासपीठ नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले. भरगच्च अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती यांनी केले तर महिलांचे स्पर्धेची तयारी करताना अनुभवलेले किस्से सांगत हसत खेळत वातावरणात व्यासपीठाच्या उपाध्यक्षा विद्या मोहिते यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
फोटो : दिशा महिला मंच आयोजित श्रावण रंग