शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पनवेल शहर संघटकपदी राकेश टेमघरे....
पनवेल शहर संघटकपदी राकेश टेमघरे....


पनवेल वैभव / दि.२० (संजय कदम) : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोकण विभाग संपर्कनेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर संघटकपदी राकेश टेमघरे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   
          यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले कि, शहर संघटक म्हणून काम करत असताना, आपणांकडून काही बाबींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. यामध्ये पक्षाचे संघटनात्मक कार्य करताना, संघटनेच्या हिताची जपणूक करणे, संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. संघटनेला व संघटनेच्या प्रतिष्ठेला आपणामुळे डाग लागणार नाही याची खबरदारी घेऊन आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निर्णय घेतेवेळेस जिल्हामध्यवर्ती, शहरशाखा कार्यालयांशी संपर्क साधण्याचा सल्ला राकेश टेमघर याना दिला.  यावेळी पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, ऍड.अमर पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : राकेश टेमघर यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत व इतर पदाधिकारी
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image