रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी रो.रतन खरोल यांची नियुक्ती....
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी रो.रतन खरोल यांची नियुक्ती....

पनवेल :   रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला रोटरी प्रांत 3131 चे सन 2025-26चे नियोजित प्रांतपाल रो. संतोष मराठे, आखील भारतीय खरोल समाजचे अध्यक्ष नंदलालजी खरोल, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, सह प्रांतपाल कमलेश अग्रवाल यांच्या प्रमूख उपस्थितीत 22-23 चे यशस्वी मावळते अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आपली धुरा सन 23-24 चे  नवनिर्वाचित अध्यक्ष रतन खरोल यांच्या हाती सुपूर्द केली तर सचिव अनिल ठकेकर यांनी आपली धुरा अनिल खांडेकर यांच्या हाती दिली. सदर समारंभात नविन संचालक मंडळाच्या सदस्यांना रोटरी पीन व मानाची राजस्थानी टोपी देऊन गौरविण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी रोटरी प्रांत 3131 मध्ये 22-23 प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व सहकाऱ्यांचा भरभरून कौतुक केले व नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
सदर समारंभासाठी मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण, अंथनी गॅरेज चे गौरव त्रिवेदी, असाई ग्लास चे प्रशांत माशेलकर, रोटरी ग्रामसभा वाकडीचे अध्यक्ष वैभव गायकवाड, वनवासी कल्याण आश्रमशाळा चे सतिश गुणे, मोहन मुजुमदार,शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. कापसे, प्रकाश पाटील, योगेश महाजन, डॉक्टर संतोष जाधव, मुनाभाई चौधरी आदी मान्यवरांसह इतर क्लबचे अध्यक्ष,रोटरी सदस्य, ऍनस, अनेटस, रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image