3 ऑगस्ट ला सिडको कार्यालयावर मोर्चा ....
पनवेल/प्रतिनिधी :-- करंजाडे वसाहतीला तीव्र पाणी करण्यास टंचाई निर्माण झालेली आहे. करंजाडे वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने उन्हाळयासारखीच स्थिती झाली आहे. एमजेपीच्या पाणी प्रकल्पावरील पंप नादुरुस्त झाल्याने करंजाडेकरांच्या घशाला कोरड पडत असल्याने करंजाडे नागरिक महिला यांनी आता आक्रमकतेची भूमिका घेतली आहे. त्यानुसार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी दिली.
यावेळी करंजाडेकरांनी सिडकोवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बैठकीला माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, मा. उपसरपंच योगेंद्र कैकाडी, शिवसेना उद्धव ठाकरे गट करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड, माजी पोलीस अधिकारीव रहिवाशी सी.टी. पाटील, चंद्रकांत गुजर निखिल भोपी, किरण पवार, यांच्यासह नागरिक महिला मोठया प्रमाणात उपास्तित होते.
सिडकोची स्वःताची यंत्रणा नसल्याने पाण्याकरीता पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून राहावा लागत आहे. भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि वायाळ येथील पंप नादुरुस्त असल्याने पंपिग बंद पडते. यामुळे एमजेपी सिडकोला पाणीपुरवठा करीत नाही यामुळे गेल्या काही दिवसापासून करंजाडे वसाहतीला पाण्याची टंचाई भासत आहे. एमजेपी आणि सिडको यांच्या घोळात मात्र करंजाडेकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावेळी पाणी सुरळीत होण्याकारिता करंजाडे महाविकास आघाडीकडून पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर करंजाडेकरांनी सिडकोच्या कामकाजमाबाबत बाबत नाराजी व्यक्त केली असून 3 ऑगस्ट रोजी सिडको भवनवर जल आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले. या मोर्चामध्ये समस्त सर्व नागरिक व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव गायकवाड यांनी केले आहे.
"सोमवारी सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे नियोजन"..
गेल्या अनेक महिन्यांपासून करंजाडे वसाहतीला पाण्याची सामस्या भेडसावत आहे. याबाबत सिडको कार्यालयावर जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन सिडको ला देताच सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणी समस्याबाबत सिडको कार्यालयात बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी पोलीस अधिकारी व स्थानिक रहिवाशी सी.टी. पाटील यांनी सांगितले.
"पाण्याचा प्रश्न शासन दरबारी पोहोचलाच पाहिजे"..
एमजेपी आणि सिडको या दोघांच्या भांडणात आम्हां करंजाडे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे 3 ऑगस्ट च्या जल आक्रोश मोर्च्यादरम्यान आपल्या करंजाडे वसाहतीचा आवाज शासन दरबारी पोहोचवू स्थानिक रहिवाशी व जेष्ठ शिवसैनिक चंद्रकांत गुजर यांनी आक्रमक भूमिका मांडली.