" रोटरी गार्डन" च्या कामाचे उद्धाटन...
" रोटरी गार्डन" च्या कामाचे उद्धाटन...

पनवेल : -  पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन हा रोटरी च्या प्रमुख स्तंभांपैकी एक महत्वाचा स्तंभ आहे . आणि  पर्यावरणासाठीचे उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चा हातखंडा आहे हे आपण सर्व जाणतो . 

दिनांक 5 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ने नियोजित केलेल्या *" रोटरी गार्डन"* च्या कामाचे उद्धाटन रविवार, दिनांक 4 जून रोजी रोटरी  क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सन्माननीय सभासद , पनवेल महानगरपालिका मा . सभागृह नेते रो .परेश ठाकूर  आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सन्माननीय प्रांतपाल डॉ. अनिल परमार  यांच्या शुभ हस्ते आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल  चे मार्गदर्शक PDG  ARRFC डॉ. गिरीश गुणे  यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडले.

या उद्घाटनाप्रसंगी डॉ. संजीवनी गुणे , रोटरी वर्ष 2023 - 24 चे अध्यक्ष रतन खरोल, 2022 - 23 चे सचिव अनिल ठकेकर , प्रोजेक्ट चेअरमन  सुदीप गायकवाड, माजी अध्यक्ष  सुनिल गाडगीळ ,  संतोष घोडींदे , डॉ .रमेश पटेल , डॉ लक्ष्मण आवटे , भावी अध्यक्ष शैलेश पोटे , दर्शन वनगे ,अतिष थोरात, ऋषीं बुवा , मनोज आंग्रे , अनिल खांडेकर , प्रीतम कैया आणि विक्रम कैया ,
 ऍनस मोना खरोल ,ऍनस मैत्रेयी आंग्रे आणि अनेटस यांनी 
 उद्घाटना प्रसंगी उपस्थिती दर्शवली .
Comments