लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदार संघाची धुरा...
लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा...

पनवेल/(प्रतिनिधी): -  पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा आज (गुरुवार, दि. ०८) केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात उरणसाठी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेलसाठी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील तर अलिबागसाठी दक्षिण रायगड उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप- शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविजय अभियान २४ चे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघात कर्जतसाठी किरण ठाकरे, पेणसाठी प्रसाद भोईर, श्रीवर्धनसाठी प्रशांत शिंदे व महाडसाठी बिपीन म्हामुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image