नवीन पनवेल येथील विद्यार्थी वाहक यांना प्रगती कॉम्प्युटर तर्फे छत्रीचे वाटप..
नवीन पनवेल येथील विद्यार्थी वाहक यांना प्रगती कॉम्प्युटर तर्फे छत्रीचे वाटप..

पनवेल दि.१९ (वार्ताहर) : पावसाळ्यात विद्यार्थी वाहक यांची अडचण लक्षात घेऊन नवीन पनवेल येथील प्रगती कॉम्प्युटर च्या वतीने  पनवेल, नवीन पनवेल विभागातील शेकडो विद्यार्थी वाहकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रगती कॉम्प्युटरचे मालक.विजय चव्हाण यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आपण वेळेवर पोहोचवता त्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी पालकापेक्षा जास्त जबाबदारी आपण उचलता ही कौतुक करण्यासारखी बाब असल्याचे मत व्यक्त केले. 
              नवीन पनवेल विभागामध्ये शेकडो (ओमनी, इको) स्कुल व्हॅन नविन पनवेल व पनवेल परिसरातून विद्यार्थ्यांना ने-आण  करतात. ज्या ठिकाणी मोठ्या बस जात नाही त्या ठिकाणावर स्कुल व्हॅन जाऊन विद्यार्थ्यांना सेवा देतात. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन नवीन पनवेल येथील प्रगती कॉम्प्युटरच्या वतीने पनवेल, नवीन पनवेल विभागातील शेकडो विद्यार्थी वाहकांना छत्रीचे वाटप  करण्यात आले. यावेळी प्रगती कॉम्प्युटरचे मालक.विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आपण वेळेवर पोहोचवता त्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी पालकापेक्षा जास्त जबाबदारी आपण उचलता ही कौतुक करण्यासारखी बाब आहे.तसेच यापुढे   माझ्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी वाहक यांना आणखी काय मद्दत करता येईल याचा नक्की प्रयत्न करेन असे मत व्यक्त केले. या छत्री वाटप कार्यक्रमावेळी बी एल पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत माने, पत्रकार सुरेश भोईर, नवीन पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, खजिनदार शहाजी बोकडे, सचिव हनुमान कोळी, सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.




फोटो : छत्रीवाटप
Comments