लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा...
रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा...
पनवेल दि.०४ (संजय कदम)  :लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम पनवेल शहर व परिसरात राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा देण्यात आली व त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. 
                        जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन राजाराम पाटील यांच्या वतीने व संस्थेच्या माध्यमातून शहरातील तालुका पोलीस स्टेशन दत्त मंदिराजवळ व ठाण नाका रोड येथे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी आसन व्यवस्था (बेंच) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या बेंचचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी रिक्षा बांधवांसह प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . या आसन सुविधेबद्दल रिक्षा चालकांनी जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन राजाराम पाटील यांचे आभार मानले आहेत. 
फोटो : बेन्चचे वाटप
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image