उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन केणी...
उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन  केणी...


उरण / दि 5 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दैनिक पुण्यनगरी, रामप्रहरचे  प्रतिनिधी  जीवन गोपाळ केणी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून, सचिव पदी कृषिवलचे वार्ताहर  दत्तात्रेय अनंत  म्हात्रे तर उपाध्यक्ष  म्हणून दैनिक नवे शहरचे दिनेश नामदेव  पवार यांची निवड  5 जून 2023 रोजी 11:00 वाजता  उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीचे पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुछ देऊन  अभिनंदन करण्यात आले.यावेळी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष दैनिक सामना, लोकमतचे प्रतिनिधी व  कार्यकारिणी सदस्य मधुकर ठाकूर,दैनिक सागरचे  प्रदीप पाटील, दैनिक लोकसत्ताचे जगदीश तांडेल, सामनाचे  सूर्यकांत म्हात्रे, रायगड टाईम्सचे अनंत नारंगीकर,पुढारीचे  राजकुमार भगत,सकाळचे महेश भोईर व आपलं महानगरचे  सुभाष कडू उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image