महेश्वरी समाज पनवेल तर्फे महेश नवमी सोहळा उत्साहात साजरा...
महेश्वरी समाज पनवेलतर्फे महेश नवमी सोहळा साजरा... 
पनवेल- पनवेलच्या महेश्वरी समाजातर्फे महेश नवमी सोहळा पनवेलमध्ये मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला.
          महेश नवमीनिमित्त दीप प्रज्वलन करून बालाजी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपारिक पोशाखामध्ये स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.शोभा यात्रेच्या रथामध्ये शंकर महादेवाची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पनवेलच्या वेगवेगळ्या भागातून शोभायात्रा फिरल्यानंतर परत बालाजी मंदिरात आली. त्यानंतर अभिषेक,वंदना व आरती करण्यात आली.
        याप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,उरणचे आमदार महेश बालदी,माजी नगरसेवक राजू सोनी त्याचप्रमाणे माहेश्वरी वेलफअर असोसिएशन खारघरचे अध्यक्ष डॉ.राकेश सोमानी व सदस्य तसेच अखिल भारतीय माहेश्वरी संघचे कार्यकारिणी सदस्य श्याम भुतडा,महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा कार्यकारिणी सदस्य महेश राठी,कोंकण विभाग माहेश्वरी सभा समिती संयुक्त मंत्री भगवान मालपाणी,रायगड जिल्हा अध्यक्ष  प्रवीण नावदंर, सचिव  रामेश्वर कलंत्री, पनवेल तालुका अध्यक्ष मनोज जाजू,सचिव  विनोद अट्टल,खजिनदार राजेश गिलडा इतर कमिटी सदस्य व माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते.
         या शोभायात्रेचे आयोजन पनवेल महेश्वरी समाज, महेश्वरी प्रगती मंडळ,महेश्वरी महिला मंडळ यांनी केले.
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image