शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; शेकडो जणांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश...
शेकडो जणांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश...
पनवेल वैभव दि.०३(वार्ताहर):  शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ जून रोजी परमशांतीधाम वृद्धाश्रम तळोजा या ठिकाणी फळ व चादरी वाटप करण्यात आले. लाडू तुला करून या लाडूंचे वाटप करण्यात आले तसेच कळंबोलीत आरोग्य शिबीर ही ठेवण्यात आले होते.
     शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी वाढदिवशी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, हारतुरे पुष्पगुच्छ न आनता शैक्षणिक साहित्य भेट द्या. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी दोन टन वह्या जमा करून वही तुला करण्यात आली. या वह्या परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत. रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे औचित्यसाधून शेकडो महिला आणि तरुणांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.




फोटो : रामदास शेवाळे वाढदिवस
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image