'हर घर सावरकर' संकल्पने अंतर्गत 'सागरा प्राण तळमळला' नाटकाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
 पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
पनवेल / प्रतिनिधी : -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या "हर घर सावरकर" संकल्पने अंतर्गत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांच्या पुढाकाराने व आदेशाने पनवेल येथे 'सागरा प्राण तळमळला' या नाटकाचा विनामूल्य प्रयोग शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या माध्यमातून पनवेलकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला. 

शिवसेना- भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन यशस्वी करण्यात आले .प्रचंड संख्येने सदर प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रयोगादरम्यान नाट्यरसिकांचा व सावरकर प्रेमींचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचवणे या प्रामाणिक जाणिवेतून ही मोहीम सुरू आहे. सावरकर आणि हिंदुत्व फक्त एखाद्या प्रसंगापुरते - राजकारणासाठी वापर न करता एखादे व्रत घेतल्याप्रमाणे सावरकरांच्या विचारांचा जागर हा कायम सुरू असल्याचे यावेळी दिसत होते. 

याप्रसंगी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहरसंघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, तोफिक बागवान, साहिल भुस्कुटे तथा शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक व बीजेपी सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन व संपूर्ण टीमचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image