केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले संसारे कुटुंबियांचे सांत्वन....
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले संसारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.... 


पनवेल दि.०१ (वार्ताहर) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसार यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यानिमित्त मनोज संसारे यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली व सांत्वन केले. 
           स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ४ जून रोजी पेण येथे आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी पेण येथील सर्व कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांनी घेतली.  हा कार्यक्रम युवा नेते अनिकेत संसारे, सुमित संसारे, आणि सागर भाई संसारे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाकरिता पक्षाचे नेते बाळाराम जाधव, अमित हिरवे, अशोक वाघमारे हे नेते उपस्थित राहणार आहे.  कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय धोत्रे, अमित कांबळे,  नागेश सुर्वे,  मुमताज पठाण, भारत दाताड,  दिलीप नाईक, समाधान कांबळे इत्यादी कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
फोटो : संसारे कुटुंबियांचे सांत्वन करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image