भाडेकरूची नोंद पोलीस ठाण्यात न केल्यास भाडेकरूविरोधात असलेल्या गुन्हयात घरमालकाविरूद्ध होणार कारवाई.....
गुन्हयात घरमालकाविरूद्ध होणार कारवाई..... 

पनवेल दि.०४ (संजय कदम) : सदनिका भाडयाने दिल्यानंतर जर सदनिका मालकाने भाडेकरूची नोंद पोलीस ठाणेकडे नोंद केली नाही. आणि भाडेकरू यांनी कोणताही गुन्हा अगर अक्षेपार्ह कृत्य केल्यास सदनिका मालकाविरूद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली आहे.    
पनवेल शहरात वाढते शहरीकरण आणि चांगल्या दर्जाच्या सुविधांमुळे आसपासच्या परिसरातून लोक राहण्यास येत आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या करंजाडे, पुष्पकनगर, पळस्पे परिसर व काही ग्रामीण भाग येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच वाढती गुन्हेगारीवर ताबा मिळवण्याचा दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पत्रक काढून पोलीस ठाण्यात भाडेकरू बाबतची परिपुर्ण माहिती देणेबाबत सुचना केल्या आहेत. या पत्रकात सर्व सोसायटी/चाळ/विविध आस्थापनांमध्ये भाडयाने वास्तव्यास असलेल्या नागरीकांची माहीती विहीत नमुन्यामध्ये पोलीस ठाणेस सादर करणे आनिवार्य आहे. तसेच सदनिका भाडयाने दिल्यानंतर जर सदनिका मालकाने भाडेकरूची नोंद पोलीस ठाणेकडे नोंद न केल्यास आणि भाडेकरू यांनी कोणताही गुन्हा अगर अक्षेपार्ह कृत्य केल्यास सदनिका मालकाविरूद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी केले आहे. तसेच संदर्भात कोणतीही मदत लागल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२२-२७४५२३३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
फोटो : विजय कादबाने
Comments