गळ्यातील सोन्याची गंठण खेचून चोरटे पसार..
गळ्यातील सोन्याची गंठण खेचून चोरटे पसार..


पनवेल / दि.३१ (संजय कदम) : मोटारसायकलवरून आलेल्या दुकलीने गळ्यातील सोन्याची गंठण खेचून पसार झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर किरवली गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
         विद्या दिलीप चिंचोळकर (वय 45, रा. कौसा,जि. ठाणे) ह्या मुंब्रा-पनवेल रोडने पनवेल कडे येत असताना किरवली गावाच्या जवळ जयेश लॉजचे पुढे विमल पेपर मार्ट या कंपनीच्या समोर काळ्या-निळ्या रंगाची बजाज पलसर 220 मोटार सायकल वरून आलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील दोघा इसमांनी त्यांच्या गळ्यातील १५ तोळे वजणाचे अंदाजे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण पळवून नेले. गंठण खेचण्यादरम्यान विद्या चिंचोळकर यांच्या मानेला दुखापत झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव बडे करीत आहेत.
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image