भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची नियुक्ती..
 अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची नियुक्ती..

पनवेल दि.०९ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये पनवेलचे सुपुत्र, भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आती आहे.
         पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी बांधकाम समितीचे सभापती म्हणून पनवेल महापालिकेत चांगले काम केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील ते काम करीत आहेत. यापूर्वी पक्षाने त्यांच्यावर दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो : मनोज भुजबळ
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image