तीन गाईंची चोरी ....
अज्ञात चोरट्याकडून नेरे पाडा येथील तीन गाईंची चोरी  ....

 पनवेल / वार्ताहर - : नेरेपाडा येथील तीन गाईंची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पनवेल तालुक्यात गुरे चोरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नेरेपाडा येथील रोहिदास भगत यांनी दोन गाई गोठ्यात बांधल्या होत्या. सकाळी ते गाय पाहण्यासाठी गेले असता त्यांना गाय दिसून आली नाही. तसेच वामन खुटले हे देखील त्यांची गाय बांधलेल्या ठिकाणी पाहायला गेले असता गाय दिसून आली नाही. त्यांनी गायींचा परिसरात शोध घेतला मात्र त्या सापडून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने या तिन्ही गाई चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
Comments