बेकायदेशीर दारूसाठा हस्तगत.....
  बेकायदेशीर दारूसाठा हस्तगत.....


पनवेल / दि.०४ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का रोड तसेच तालुक्यातील पडघेगाव येथे विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दोघा इसमांवर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे. 
             विनायक मल्हारी बगाटे उर्फ राजु (वय ३८) हा पनवेल रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का रोड शिवमंदीरा जवळ बिअरच्या तसेच मॅग्डॉल कंपनीची विस्कीच्या बाटल्या त्याच्या ताबे कब्जात बाळगुन विनापरवाना विक्री करीत असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी देशी विदेशी मद्यसाठा असे एकूण ८ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर दुसऱ्या घटनेत पडघे गाव येथे एक ज्येष्ठ नागरिक बेकायदेशीर विनापरवाना देशी दारू ताब्यात बाळगुन विक्री करीत असताना आढळून आला. तळोजा पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करत ९४५ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
Comments