कायदेशीर कर्तव्य पार पाडित असलेल्या लोकसेवकाच्या अंगावर घातली गाडी....
 लोकसेवकाच्या अंगावर घातली गाडी...


पनवेल दि ०३, (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील शेडुंग टोल नाक्याच्या पुढे कायदेशीर कर्तव्य पार पाडीत असलेल्या एका लोकसेवकाच्या अंगावर चार चाकी वाहन चालकाने गाडी घातल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सदर गाडी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                   पनवेल जवळील शेडुंग टोल नाक्याच्या पुढे मुंबई येथील विशेष पथकाचे क्षेत्रीय परिवहन कार्यालयाचे (आर.टी.ओ) चे अधिकारी व पथक वाहंन  तपासणी करत असताना एक वाहन चालक  मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी घेऊन आला असता त्याला थांबण्यास सांगितले असता सदर अधिकारी लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य कायदेशीरपणे पार पाडीत असताना आरोपी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना धडक मारून तो पसार झाल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे व सदर तक्रारीच्या आधारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक आरोपी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
Comments