भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी सिद्धार्थ बांठिया यांची नियुक्ती....
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी सिद्धार्थ बांठिया यांची नियुक्ती....
पनवेल / दि.०९ (संजय कदम) : पनवेलचे माजी बांधकाम सभापती सिद्धार्थ बांठिया यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिद्धार्थ बांठिया यांना देत त्यांचे अभिनंदन केले.
               भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेशची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये पनवेलचे माजी बांधकाम सभापती सिद्धार्थ बांठिया यांची प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धार्थ बांठिया यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला राम राम करत भारतीय जनता पार्टीच्या विकासाचे कमळ हाती घेतले होते. त्यांचे संघटन कौशल्य आणि काम करण्याची पद्धत पाहता त्यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिद्धार्थ बांठिया यांना देत त्यांचे अभिनंदन केले आणि भारतीय जनता पक्षाच्या वृध्दीकरिता या कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य महत्वाचा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या या नियुक्तीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. 
फोटो : सिद्धार्थ बांठिया नियुक्ती
Comments