बेस्ट नर्स म्हणून सुजाता शिजत कदम सन्मानित..
बेस्ट नर्स म्हणून सुजाता शिजत कदम सन्मानित.. 


पनवेल / दि.२०(संजय कदम):  खारघर मधील सुकृत मॅटरनेटिक क्लिनिक येथील डॉक्टर नीना पच्छापुरकर यांच्याकडे गेली पंधरा वर्षे सीनियर स्टाफ नर्स म्हणून सुजाता शिजत कदम या काम करत आहे. त्याची दखल घेऊन नर्सिंग डे ला डॉक्टरांच्यावतीने बेस्ट नर्स म्हणून सन्मानित करण्यात आले.
    या बाबत सुजाता सुभाष कदम म्हणाल्या की, खारघर मधील सुकृत मॅटरनेटिक क्लिनिक येथील काम करत आहे. या काळात हॉस्पिटल मॅनेजमेंट पेशंट रिलेशन स्टाफ मॅनेजमेंट याबाबतीत कधीच कंप्लेंट नाही. तसेच हॉस्पिटलचा कोणतेही काम माझं काम समजून केले ते माझं कर्तव्य समजून सेवा करत होते. त्याची दखल डॉक्टर नीना पच्छापूरकर यांनी घेत मला बेस्ट नर्स म्हणून सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून एक आदर्श डोळ्यासमोर सतत ठेवले असल्याचेही त्यांनी सांगिलते. 
फोटो: सुजाता कदम सन्मान
Comments