शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांच्या मागणीची पालिकेकडून दखल ; कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात...
कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात...   
पनवेल दि.०२ (संजय कदम) : कुंभारवाडा परिसरातील नालेसफाई करून औषधे फवारणी करा अशी मागणी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची पनवेल महापालिकेने तात्काळ दखल घेत कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. 
            कुंभारवाडा परिसरातील संत गोरा कुंभार मंदीर व परिबाबा सय्यद उस्मानशाह बाबा यांचा दर्गा परिसरातील नाल्यामध्ये घाण साठले आहे. यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न व दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ या ठिकाणची साफसफाई करावी अशी मागणी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची पनवेल महापालिकेने तात्काळ दखल घेत कुंभारवाडा परिसरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रतीक वाजेकर यांचे आभार मानले.
फोटो : नालेसफाई आणि शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image