काळभैरव मंदिरात चोरी करणारे २ आरोपी गजाआड..
काळभैरव मंदिरात चोरी करणारे 2 आरोपी गजाआड..

पनवेल, दि.4 (संजय कदम) ः  पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत चिंचपाडा सेक्टर आर- 3 , येथील काळभैरव मंदिरातील कडी कोयंडा तोडून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे व दानपेटी मधील रक्कम चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात आरोपींनी पहाटेच्या सुमारास आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या तीन दानपेट्यांमधील रोख रक्कम तसेच परिसरातील 6 सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. दिलीप शिंदे (प्रशासन),   पो.नि. प्रमोद पवार (गुन्हे), पो. उप.नि. अभयसिंह शिंदे, पोहवा रवींद्र राऊत, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे माहिती घेतली असता आरोपी रोहित साळुंखे (रा.कामोठे गाव) व मारुती केंद्रे (रा.छोटा खांदा) यांच्याबाबत माहिती मिळाल्याने सदर दोन आरोपींना सापळा रचून पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. सदर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग दिसून आल्याने अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून  चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोटो ः मंदिरातील चोरी
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image