कळंबोलीत सोसायटी इलेक्शन फीवर अमरदीप सोसायटीत क्रांतिवीर पॅनलचा विजय..
कळंबोलीत सोसायटी इलेक्शन फीवर अमरदीप सोसायटीत क्रांतिवीर पॅनलचा विजय..


कळंबोली / वार्ताहर - : निवडणूक म्हटली की आपण फक्त राजकीय निवडणूकच डोळ्यासमोर ठेवतो. या मध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आमदार खासदार सरपंच उपसरपंच यांच्याच आपण लढती आणि चुरस पाहतो. परंतु कळंबोली वसाहती मधील अमरदीप सोसायटीमध्ये झालेल्या हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीची चुरसही कळंबोलीकरांना पहावयास मिळाली. शासनाच्या नियमानुसार निवडणुकीची प्रक्रिया पार करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची उधळण करीत नवनिर्वाचित क्रांती पॅनलचे अभिनंदन अन् हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
      
कळंबोली वसाहती मधील सेक्टर चार मध्ये असणाऱ्या अमरदीप हाऊसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल सहनिबंधकांच्या मार्गदर्शनानुसार वाजवण्यात आले. एकूण 125 सभासद संख्या असलेल्या या सोसायटीमध्ये गतकाळातील कार्यकारी मंडळांनी उत्तम कामगिरी केल्याने त्याने पुन्हा आपले पॅनल निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीमध्ये शासनाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया ही  अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडली.मतदान घेऊन मतदानाची मतमोजणी केल्यानंतर सोसायटी मधील क्रांती पॅनल ने सर्वच्या सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दाखवले .यामध्ये एकूण मतदार १२५ , झालेले मतदान ८८ होते. या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून  महेंद्र रावेरकर यांनी काम पाहिले. क्रांतिवीर पॅनल निवडून येण्यासाठी रामदास इंगळे,हरीश ठाकूर, विठ्ठल मोकल ,शिंदे, इंदुलकर, सकपाळ,भोसले यांनी मेहनत घेतली .सर्व विजयी उमेदवारांची ढोल, ताशे,फटाके फोडून,गुलाल उधळून जंगी मिरवणूक काढण्यात आली.सर्व साधारण श्री. ठाकूर हरिश्चंद्र नामदेव, सकपाळ गौतम मारुती, धनवडे पांडुरंग, शिंदे उत्तम ,पवार दत्तात्रय इंदुलकर प्रकाश , रामधारणे सुरेश , घाडगे विकास NT उमदेवार मध्ये आव्हाड बापू SC उमेदवार मध्ये  इंगळे रामदास ,ओबीसी उमेदवार मध्ये मोकल विठ्ठल ,महिला राखीव मध्ये  सौ. काळे ज्योती सौ.सुरेखा मोकल या विजयी नवनिर्वाचित उमेदवारांचा समावेश आहे .या सर्वांचे सोसायटीच्या वतीने गुलाल उधळीत अभिनंदन करण्यात आले.
Comments