मा.नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड शिबीराचे आयोजन....
आधार कार्ड शिबीराचे आयोजन....

पनवेल दि.१० (वार्ताहर) : भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पनवेल वकीस संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने नवीन पनवेल येतील मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आधार नोंदणी, आधार अपडेट करण्यात आले. 
                    माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे सर्वसामान्यांना मदत करण्याचे ध्येय्य समोर ठेऊन अ‍ॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी हा उपक्रम राबवला. या शिबिराला नागरीकांना उदंड प्रतिसाद लाभला असून शिबीराचे आयोजन केल्याबद्दल नागरीकांनी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे आभार मानले. भारतीय जनता पक्ष हा जनसेवेसाठी सदैव झटणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आधार कार्ड शिबिरावेळी केले.
फोटो : आधारकार्ड शिबीर
Comments