भरधाव ट्रकची मोटारसायकलवरील पती-पत्नीला ठोकर ; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी..
भरधाव ट्रकची मोटारसायकलवरील पती-पत्नीला ठोकर ; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी..


पनवेल / दि.२४ (वार्ताहर) : तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक  करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. 
         ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय २६) हा त्याची पत्नी रविना प्रविण पाटील (वय 26) हिला घेऊन तिला तळोजा गाव येथे दवाउपचार कामी घेवुन जात असतांना आरएएफ सिग्नल ओलांडत असतांना पाठीमागुन येणारा ट्रक क्रं. एमएच ०४ डीडी २५३३ वरील अज्ञात चालकाने भरधाव चालवुन ओव्हटेक करीत असताना अचानक डाव्या बाजुस वळवून मोटार सायकलीस ठोकर मारली. यामध्ये पत्नी रविना हि गंभीर जखमी होऊन मयत पावली तर पती प्रविण पाटील ह्याचा उजवा हात फॅक्चर झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments