मोटारसायकची चोरी.....
मोटारसायकची चोरी.....

पनवेल /  दि.१४  (संजय कदम) : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील राजे कॉप्लेक्स बिल्डींगमधील पार्किंगमध्ये उभी  केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.    
                    दुन्द्रे गावातील गणेश महादु उसाटकर यांनी त्यांची ५ हजार रुपये किमतीची काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्पेंडर मोटारसायकल क्र एमएच ०६ यु ९९६२ हि  छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील राजे कॉप्लेक्श बिल्डींगमधील पार्किंगमध्ये उभी  करून ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने हि मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी गणेश उसाटकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
Comments