कामोठे कॉलोनी फोरम अणि माधवबाग क्लिनिकच्यावतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन...
आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन...

पनवेल / वर्ताहर दि.०७ :-  जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कामोठे कॉलोनी फोरम अणि माधवबाग क्लिनिकच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ०७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस जगभर आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी *आरोग्य सर्वांसाठी* या थीमनुसार जगभर आरोग्य दिन साजरा करण्यात येत  आहे. लोकांमधे आरोग्याविषयी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी ह्या ऊद्देशाने ह्या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेद शास्त्रानुसार दररोज 3 किलोमीटर चालल्यास आपण मधूमेह सारख्या आजाराला दुर ठेवू शकतो. तसेच रोज 10000 पाऊले चालल्याने मधूमेही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवू शकतात. हा मेसेज लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  3 किलोमीटर वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे सेक्टर 20 येथील सेंट्रल बँक पासून सुरू झालेल्या वॉकेथॉनला ऐश्वर्या हॉटेल, पोलिस स्टेशन चौक, मनमोहन स्वीट्स, गोकुळ डेयरी ह्या मार्गाने जात सेंट्रल बँक जवळ सांगता झाली. 300 पेक्षा जास्त नागरिकांनी वॉकेथॉन मधे सहभाग नोंदवला.  
माधवबागच्यावतीने डॉ. मनोजकुमार केवट तसेच कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने अध्यक्ष मंगेश अढाव अणि महिला अध्यक्षा जयश्री झा ह्यांनी धन्वंतरी पूजन करून वॉकेथॉनचा शुभारंभ करत स्पर्धेला सुरवात केली. 3 किलोमीटर चालून स्पर्धा पुर्ण केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक वाटण्यात आले.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image