अभिजीत स्ट्राईकर्स ठरले ‘लाईन आळी प्रीमिअर लीग’ चे विजेते....
अभिजीत स्ट्राईकर्स ठरले ‘लाईन आळी प्रीमिअर लीग’ चे विजेते....

पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेलच्या लाईन आळीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘लाईन आळी प्रीमिअर लीग २०२३’ चा अभिजीत स्ट्राईकर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. माजी नगरसेवक आणि संस्थेचे अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. 
                 सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पनवेलच्या लाईन आळीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘लाईन आळी प्रीमिअर लीग २०२३’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत संदीप पाटील यांचा ‘अभिजीत स्ट्राईकर्स’ संघाने पंकज पडवळ यांच्या ‘पी. पी. पँन्थर’ वर विजय मिळवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. संस्थेचे अध्यक्ष रमेश (दादा) गुडेकर यांच्या हस्ते दोन्ही संघांना चषक देऊन गौरवण्यात आले. 
फोटो : लाईन आळी प्रीमिअर लीग
Comments