भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक उत्साहात संपन्न...
भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक उत्साहात संपन्न...

पनवेल ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक रविवारी (दि. 23) सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. 
पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या जिल्हा समन्वयक संध्या शारबिद्रे, मंजुषा कुद्रीमोती, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मोनिका महानवर, हर्षदा उपाध्याय, कुसुम म्हात्रे, राजश्री वावे, नेत्रा पाटील, आरती नवघरे, प्रमिला पाटील, संगीता कांडपाल, माजी जि.प. सभापती प्रिया मुकादम, मृणाल खेडेकर, वनिता पाटील, संगीता पाटील, रसिका शेट्ये, आरती तायडे, गीता चौधरी, सुहासिनी शिवणेकर, सुजाता दळवी, शोभा काटे, साधना पवार, मनीषा निकम, राणी म्हात्रे, निर्मला घरत, स्नेहल गोगटे, स्वामिनी मांजरे, बिनिता घुमरे आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 
या बैठकीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
Comments