राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व रामदास शेवाळे यांची शिवसेनेच्या पनवेल जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती....
शिवसेनेच्या पनवेल जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती....

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः पनवेलसह नवी मुंबई व ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणारे त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात धडाडीचे नेतृत्व म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे रामदास शेवाळे यांची आज वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या पनवेल जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून तशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना आज देण्यात आले.
रामदास शेवाळे यांनी सातत्याने सामाजिक कार्यात काम करताना कोणताही दुजाभाव न ठेवता जो त्यांच्याकडे येईल त्याला सढळ हस्ते मदत केली आहे. शैक्षणिक असो, आरोग्यविषयक असो, कौटुंबिक विषय असो, नोकरी विषय असो या सर्व समस्यांवर त्यांनी अनेकांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात त्यांनी आपले वेगळे वलय निर्माण केले आहे. ते करत असताना त्यांनी पतपेढीच्या माध्यमातून समाज बांधवांना मदत करण्याचे काम सुद्धा केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेवून त्यांच्या आदेशाने त्यांना पनवेल जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. व सदर नियुक्तीपत्र शिवसेना सचिव संजय मोरे व किरण पावस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. 
यावेळी लातूर जिल्हा संपर्कप्रमुख अ‍ॅड.श्रीनिवास क्षीरसागर, अमित सर, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, विजय जाधव, संजय शेडगे, आनंदा माने, नवनाथ वणवे, विराट पवार, सुधीर ठोंबरे, सुभाष घागडे, मदन वगरे, महेश गोडसे, राहूल मोरे, सिद्धेश म्हात्रे, प्रेम गोडसे, ओमकार बळीप आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. या त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.





फोटो ः रामदास शेवाळे यांना नियुक्तीपत्र देताना  मान्यवर
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image